&

युगप्रवर्तक – डॉ . हेडगेवार

0 Ratings

डॉक्टरांचे तपस्वी आणि तत्त्वरूप जीवन नित्यचिंतनाचा आणि नित्यप्रेरणेचा विषय आहे. डॉक्टरांचे जीवन एकूण समाजासमोर आणि विशेषतः सामाजिक कार्यकर्त्यासमोर (केवळ संघकार्यकर्ते नाही) वारंवार येणे अगत्याचे आहे इतके ते मार्गदर्शक आहे.

Add to BookShelf

Overview

सांस्कृतिक वार्तापत्राचा ‘युगप्रवर्तक’ डॉ. हेडगेवार’ विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हांस विशेष समाधान होत आहे. परमपूजनीय डॉक्टरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा विशेषांक प्रसिध्द होत आहे. डॉक्टरांचे तपस्वी आणि तत्त्वरूप जीवन नित्यचिंतनाचा आणि नित्यप्रेरणेचा विषय आहे. डॉक्टरांचे जीवन एकूण समाजासमोर आणि विशेषतः सामाजिक कार्यकर्त्यासमोर (केवळ संघकार्यकर्ते नाही) वारंवार येणे अगत्याचे आहे इतके ते मार्गदर्शक आहे. डॉक्टरांनी सुरु केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज राष्ट्रजीवनाच्या मध्यवर्ती स्थानावर पोचला आहे. कुणाला प्रामाणिकपणे संघ जाणून घ्यायचा असेल तर त्याला डॉक्टरांचे जीवन आणि कार्य जाणून घेण्यावाचून गत्यंतर नाही. डॉक्टरांनी संघाला नुसते जीवनदान दिले असे नाही तर अक्षरशः आपल्या रक्ताचे पाणी करून त्याला वाढवले. संघाचे ध्येय आणि कार्यपध्दती, संघाचे संकेत आणि व्यवहार हे डॉक्टरांच्या असामान्य प्रतिभेचे आविष्कार होत. हा विशेषांक करताना वाचकांसमोर काहीतरी नाविन्यपूर्ण ठेवावे अशी इच्छा होती. संघाच्या अभिलेखागारात परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेली डॉक्टरांसंबंधीची हजारो कागदपत्रे खुणावत होती. त्यातील अनेक कागदपत्रे अप्रकाशित किंवा साथ-सत्तर वर्षांपूर्वी ही कागदपत्रे पाहताना वाचताना मनात कोणत्या भाव-भावना दाटून आल्या, हे शब्दात सांगणे अशक्य ! या सर्व कागदपत्रांचे परिशीलन करून त्याचे नवनीत वाचकांसमोर प्रस्तुत करावे असे वाटले. डॉक्टरांच्या चरित्राचा अधिक तपशिलात अभ्यास करू इच्छिणाऱ्यांची त्यामुळे सोय होणार आहे.
हा विशेषांक सिध्द करताना आपण डॉक्टरांच्या सान्निध्यात असल्याचा अनुभव आम्हांस वारंवार आला. हा विशेषांक वाचताना वाचकांना हाच अनुभव येईल अशी आशा आहे.
BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: NA
  • ISBN-10: NA
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “युगप्रवर्तक – डॉ . हेडगेवार”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK

Registration

Forgotten Password?