svatantraveer-savarkar
&

हिंदू संघटक – स्वातंत्र्यवीर सावरकर

0 Ratings

राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण' हा महामंत्र देण्याचे श्रेय सावरकरांना! त्यामुळे एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सावरकरांना वाहिलेली श्रध्दांजली होय.

Add to BookShelf

Overview

सावरकरांचे स्मरण करताच त्यांचे शतपैलू व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व डोळ्यांसमोर येते आणि ‘स्वातंत्र्यवीर’ ही त्यांना लावण्यात येणारी उपाधी अगदीच अपुरी वाटू लागते, ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’ चे ‘हिंदुसंघटक सावरकर’ हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अ.भा. हिंदूमहासभेच्या अधिवेशाच्या उद्घाटनप्रसंगी सावरकर उद्गारले होते,” माझ्या मृत्यूनंतर जर माझ्या दहनस्थळी एखाद स्मारक तुम्ही उभारणारच असाल, तर त्यावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या शब्दांपेक्षा ‘हिंदूसंघटक सावरकर’  हे शब्द कोरलेले मला अधिक आवडतील कारण स्वातंत्र्यार्थ मी जे जे प्रयत्न केले, ते सर्व हिंदुसंघटनेसाठी होते.” समरस, सुरक्षित आणि सशक्त हिंदू समाजाची निर्मिती या एकाच ध्यासाने सावरकर आयुष्यभर झिजले. ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’ चे याहून वेगळे ध्येय ते काय? आत्मविस्मृत आणि सद्गुणविकृतीने भ्रमिष्ट झालेल्या हिंदू समाजाला जागृत करताना त्यांना एकाच वेळी परकीय ब्रिटीश सरकार, स्वकीय भ्रांत हिंदू- मुस्लिम ऐक्यवादी आणि देशशत्रू असलेली मुस्लिम लीग अशा तीन आघाड्यांवर जवळजवळ एकाकी लढावे लागले. ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हा महामंत्र देण्याचे श्रेय सावरकरांना! त्यामुळे एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सावरकरांना वाहिलेली श्रध्दांजली होय.

BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: Marathi
  • ISBN-10: NA
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “हिंदू संघटक – स्वातंत्र्यवीर सावरकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK

Registration

Forgotten Password?