&

द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस

0 Ratings

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा देवरस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस' हा विशेषांक सिध्द करण्यात आला आहे.

Add to BookShelf

  • Genre:
  • Originally Published:
  • Hardcover:
  • Language:
    Marathi

Overview

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा देवरस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस’ हा विशेषांक सिध्द करण्यात आला आहे. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन बाळासाहेब सुमारे साठ वर्षे संघाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात होते. गण-शिक्षक ते सरसंघचालक हा बाळासाहेबांचा संघातील प्रवास म्हणजे संघाचा सत्तर वर्षांचा इतिहास आहे. या इतिहासाचे बाळासाहेब नुसतेच साक्षीदार किंवा भागीदार नसून त्याचे एक प्रमुख निर्माते होते. संघ स्वयंसेवकाने कसे बोलावे, कसे चालावे याचा वस्तुपाठ बाळासाहेबांच्या जीवनात सापडतो म्हणून संघ-स्वयंसेवकांसाठी त्यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व मार्गदर्शक आहे. वास्तुनिष्ठपणे विचार करणे हा बाळासाहेबांच्या स्थायीभाव होता. त्यांच्या स्वभावात भावना होती, भाबडेपणा नव्हता, बाळासाहेबांवरील लेखांच्या विभागात बाळासाहेबांची कौटुंबिक माहिती, त्यांचे व्यक्तीमत्त्व, त्यातील कास्तकार आणि वृत्तपत्रचालक हे पैलू आणीबाणीतील त्यांचे समर्थ नेतृत्व, समरसतेच्या बाबतीत त्यांची भूमिका, संघ-स्वयंसेवकांच्या घरी निवास करताना त्यांचा अनौपचारिक व्यवहार आणि बाळासाहेबांचे संघ-कार्यातील योगदान हे विषय घेतलेले आहेत.
बाळासाहेबांनीच सुरु केलेल्या प्रथेनुसार संघ-स्वयंसेवकही त्यांना अनेक प्रश्न विचारत. प्रश्नोत्तरांचा हा विभाग वाचल्यावर संघाची भूमिका स्पष्ट होतेच पण बाळासाहेबांची प्रांजल शैलीही अनुभवास येते. बाळासाहेबांचे जीवन म्हणजे आपल्या देशातील हिंदुत्व चळवळीचा अलीकडच्या काळातील आलेख होय! विशेषांकामुळे तो समजून घेण्यास वाचकांना काही अंशी मदत झाली तर हे श्रम सार्थकी लागतील.

BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: Marathi
  • ISBN-10: NA
  • Dimensions:
Customer Reviews

BOOKS BY &

SHARE THIS BOOK

Registration

Forgotten Password?