दै. मुंबई तरुण भारत यांनी प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांचा “संच” राष्ट्रभक्तीचे चे दर्शन घडविणारा आहे.
1. भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते : भारतात घडत असलेल्या राजकीय स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने चर्चा घडत असते, ती ‘भारतीय राष्ट्रवादाची.’ या देशातल्या कितीतरी महापुरुषांनी भारतीय राष्ट्रवादाविषयी स्वतःची एक भूमिका मांडली आहे. येथील माती, सांस्कृतिक वारसा, विचाराची पद्धत आणि राष्ट्र म्हणून केलेला संकटांचा मुकाबला यातून भारतीय राष्ट्रवाद साकारण्याची प्रक्रिया आजही सुरूच आहे. त्याचा परिचय करून देणारे हे पुस्तक. रा. स्व. संघाचे मा. सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी यांच्या प्रस्तावनेसह…
2. कालजयी सावरकर: सावरकरांचे कालातीत असे विचार आणि व्यक्तिमत्त्वातले पैलू समजून घेण्यासाठी नव्या दमाचे युवा लेखक उभे करणे आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देणे या दै. मुंबई तरुण भारतच्या उपक्रमांचे हे पुस्तक म्हणजे फलित आहे.
3. डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अविष्कार : रा. स्व. संघाचा जन्म हा एका विशिष्ट काळात घडत असलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा परिणाम आहे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व त्यांच्या समकालीन महापुरुषांच्या समाज चिंतनाचा हा आविष्कार मानावा लागेल. विद्यमान प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक ही वैचारिक प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल, असा विश्वास वाटतो.
Your review is awaiting approval
Hi! cialis helps performance anxietycialis a 23 ans cialisnw.com vendo cialis napolicialis instead of avodart buy cialis boots