आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक बलाढ्य सामाजिक संघटन म्हणून भारतात आणि जगातही मान्यता पावला आहे. संघाच्या विचारांना वाहून घेतलेले लोक आज देशाचे आणि अनेक राज्यांचे शासनतंत्र सांभाळत आहेत. त्यामुळे संघावर जसा स्तुतीच्या वर्षाव हॉट आहे तसेच विविध मार्गांनी आघात देखील हॉट आहेत. सध्याच्या परिस्थितीत संघ अशा एका वळणावर येऊन पोहचला आहे कि जेथे बाळासाहेब देवरस या द्रष्ट्या नेत्याच्या विचारांची कास धरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. करण बाळासाहेबांचे हे मूलगामी विचार आणि त्या विचारांचा मुळाशी असणारे प्रमुख तत्व ‘आपला देश सामर्थ्यवान व्हावा आणि हिंदू समाज संघटीत व्हावा’ हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी बाळासाहेबांच्या जीवनाचे आणि विचारांचे पुन्हा-पुन्हा अध्ययन, अनुशीलन आणि अनुसरण करण्याची गरज आहे. असे झाले तरच हिंदू तत्वज्ञान, हिंदू विचार, हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्रीयता यांना उज्ज्वल भविष्यकाळ येईल.
देवरस पर्व
सध्याच्या परिस्थितीत संघ अशा एका वळणावर येऊन पोहचला आहे कि जेथे बाळासाहेब देवरस या द्रष्ट्या नेत्याच्या विचारांची कास धरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. करण बाळासाहेबांचे हे मूलगामी विचार आणि त्या विचारांचा मुळाशी असणारे प्रमुख तत्व ‘आपला देश सामर्थ्यवान व्हावा आणि हिंदू समाज संघटीत व्हावा’ हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची वेळ आलेली आहे.
Weight | 250.00 g |
---|---|
Language | Marathi |
Pages | 224 |
Binding | Paperback |
Author |
Virag Pachpore |
Publisher |
Snehal Prakashan |
Reviews
There are no reviews yet.