दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे राष्ट्रीय विचारांचा झेंडा खांद्यावर घेतलेले आणि ‘कृतिशील वाचकांचे, कृतिशील दैनिक’ म्हणून आपली वाटचाल समर्थपणे करीत आहे. याच राष्ट्रीयत्वाची प्रेरणा, हा त्यामुळे दिवाळी अंकाचा गाभा ठरावा. त्याच अनुषंगाने ‘भारतीय मजदूर संघा’चे संस्थापक, द्रष्टे विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या अपयशानंतर हिंदू चिंतनाच्या पथदर्शी ‘थर्ड वे’- तिसर्या पर्यायाचे चिंतन केले आहे. त्याचबरोबर जगभरातील आणि खासकरून भारतातील वाढत्या इस्लामिक मूलतत्त्ववादाच्या समस्येवरील चिंतनपर लेख, मेघालयमधील जनजातींच्या धर्मांतराचा प्रश्न, ‘कलम 370’ नंतर काश्मीरच्या सद्यःस्थितीचा आढावा इत्यादी लेख हे धोेरणकर्ते, विचारवंतांसाठी पथदर्शक ठरावे. कोरोनाच्या काळातले चार देशांतील मराठीजनांचे अनुभवचित्रण, नायजेरियातील काजू प्रकिया प्रकल्प, वेदांमधील स्त्रीची प्रतिमा, मॉरिशसचा ‘काळा वारसा’ ठरलेला अप्रवासी घाट आणि इतर वाचनीय लेखही वाचकांच्या निश्चितच पसंतीस उतरतील, याची खात्री वाटते.
Reviews
There are no reviews yet.