Biography

Author Picture

CA P.G. Sharma

सीअे पुरुषोत्तम जी. शर्मा चार्टर्ड अकौंटंट असून गेली ४२ वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करत आहेत. व्यापारी मित्र या लोकप्रिय करविषयक मासिकाचे ते सहाय्यक संपादक आहेत.

व्यापारी मित्रातर्फे आयोजित आतापर्यंतच्या ९४ ज्ञानसत्रात त्यांनी आयकर, संपत्तीकर टॅक्स प्लँनिंग यावर मार्गदर्शन केले आहे. विविध व्यापारी संघटनांमध्ये आयकरावरती त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. विविध ठिकाणी लेख प्रकाशित झाले आहेत.

.भा. खंडाल विप्र मित्र शिक्षण फंड ट्रस्टचे ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. तसेच 'उमेद परिवार' या सेरेब्रल पाल्सी मतिमंद मुलांच्या संस्थेचे ते फाउंडर ट्रस्टी आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत उमेद परिवाराने वडाकिनला, सासवड रॉड येथे, 'अरविंद सौरभ' या नावाने मुलांचे पुनर्वसन सुरु केले आहे. सेंटर फॉर स्पेशल एजुकेशन या सेरेब्रल पलसीसाठी सुरु झालेल्या शाळेचे ते फाउंडर ट्रस्टी आहेत. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो.