Biography

Author Picture

Mahesh J. Risbud

पुण्याच्या नू. म. वि. शाळेतून आणि बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स व लॉ कॉलेज मधून शिक्षण घेतले.
पदव्यूत्तर शिक्षण घेताना कंपनी सेक्रेटरीचा कोर्स पूर्ण केला व्यावसायिक पात्रता मिळाल्यावर व खाजगी मोठ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर , १ ऑक्टोबर १९७९ पासून कंपनी सेक्रेटरीचा खाजगी व्यवसाय ( प्रॅक्टिस ) चालू आहे

भारतीय कंपनी सचिव संस्था पुणे शाखेच्या कार्यकारी समितीवर १९८६ ते १९९७ दरम्यान वेगवेगळी पदे सांभाळली. संस्थेच्या पश्चिम विभागीय मंडळाचे सुद्धा १९९२ ते १९९४ मध्ये निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून सदस्यत्व भूषविले . ते एका खाजगी कंपनीने गेली वीस वर्ष संचालक आहेत . लहान मोठ्या कंपन्यांना सल्ला देता देता त्यांचे प्रभोदन करायचा
प्रयत्न असतो.

त्या नवीन क्षेत्रातील अनुभवाचा फायदा इतरांना सुद्धा व्हावा म्हणून लेखनास सुरवात केली. भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या वेगवेगळ्या स्तरावरील, चेंबरच्या कार्यक्रमात व्याख्यता म्हणून सहभाग घेतला, अनुभवातून मिळालेले ज्ञान लहान कंपन्यांपर्यंत पोहोचावे म्हणून कंपनी कायद्यावर मराठीतून लेखन सुरु केले. अर्थमंथन, अर्थविश्व अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साप्ताहिकातून तसेच संपदा, उद्योग समृद्धी अशा मासिकातून, मराठी वर्तमान पत्रातून लेखन केले. व्यापारी मित्र मासिकातून असे लेखन चालू आहेच.